Free Silai Machine Scheme 2024: महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र सरकारची खास योजना; जाणून घ्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Free Silai Machine Scheme : केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते. आता केंद्र सरकारने महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना 2024 सुरु केली असून या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होईल. Free Silai Machine Scheme योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.
भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात केली असून भारतातील २० ते ४० वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
Free Silai Machine पात्रता
- या योजनेसाठी अर्ज करणारे महिला उमेदवार भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे.
- ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या पतीची महिन्याची कमाई १२,००० रुपयांपेक्षा कमी असावी.
Free Silai Machine Scheme योजनेचा उद्देश
ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्यांना मदत करणे, हा फ्री शिलाई मशीन योजनेचा उद्देश असून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना चालू केली आहे. (PM Free Silai Machine Yojana)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड,
- ओळखपत्र,
- वयाचे प्रमाणपत्र,
- जन्माचा दाखला,
- पासपोर्ट साइज फोटो,
- आधार लिंक मोबाईल नंबर,
- विधवा महिलांना विधवा प्रमाणपत्र,
- दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र
या योजनेबाबतची अधिक माहिती www.india.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. (PM Free Silai Machine Yojana Application process)