जालन्यात सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता मिळेल 80,000 रुपये पगाराची नोकरी…!

जिल्हा निवड समिती, जालना इथे लवकरच काही रिक्त जागांसाठी भरती होणार असून याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या विभागांमधील रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं असून मुलाखतीची तारीख 08 जुलै 2022 आहे.

या पदांसाठी होणार भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – एकूण जागा 07

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

● या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. शिवाय इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

● उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

● उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी तसेच शर्थी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.

किती मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

● आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना – 80,000/- रुपये प्रति महिना

● इतर भागामध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना – 75,000/- रुपये प्रतिमहिना

कोणती कागदपत्रं आवश्यक

● Resume (बायोडेटा)

● दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

● शाळा सोडल्याचा दाखला

● जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

● ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

● पासपोर्ट साईझ फोटो

● अर्ज करण्याची तारीख – 08 जुलै 2022

● या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jalna.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

📍मुलाखतीचा पत्ता

मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!