10वी उत्तीर्णांनो संधी सोडू नका..! रेल्वेमध्ये 2972 पदांसाठी बंपर भरती सुरू, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी…

रेल्वे रिक्रूटमेंट सेल, RRC ने पूर्व रेल्वेमध्ये शिकाऊ पदांच्या नोकरी भरतीसाठी अर्ज मागवले असून या पदांसाठी 11 एप्रिल 2022 पासून RRCCR, rrcer.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर केले जात आहे. रेल्वेकडून दरवर्षी तरुणांना इंटर्नशिपच्या माध्यमातून रोजगाराची सुवर्णसंधी दिली जाते.

यावर्षी सुध्दा 2972 शिकाऊ पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 8वी, 10वी उत्तीर्ण व ITI कोर्स करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेतर्फे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देखील मिळेल.

प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीना रेल्वेच्या आगामी ‘गट डी’ भरतीमध्ये 20% आरक्षण सुद्धा दिले जाईल. सध्याच्या RRB गट डी भरतीमध्ये सुद्धा शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्यात आलेली आहे.

2972 पदांमध्ये हावडा विभागातील 659, लिलुआ विभागातील 612, सियालदह विभागातील 297, कांचरापारा विभागातील 187, मालदा विभागातील 138, आसनसोल विभागातील 412 आणि जमालपूर विभागातील 667 पदांचा समावेश आहे.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

एकूण रिक्त पदे – 2972

पात्रता – 10वी पास आणि ITI

नोकरीचे ठिकाण – भारत

अर्ज फी खुली – 100

राखीव श्रेणी – 0

वयोमर्यादा – 15 ते 24

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022

अधिकृत वेबसाइटhttps://er.indianrailways.gov.in/

निवड प्रक्रिया – मुलाखत/ चाचणी

अर्ज कसा करावा – ऑनलाइन

ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3KAT0Us

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!