Government ends lottery system for distributing agricultural land: लॉटरी पद्धत बंद; आता ‘ही’ कागदपत्रे जोडून करा अर्ज ‘मागेल त्याला शेततळे’

Government ends lottery system for distributing agricultural land : उन्हाळ्यात बागायती क्षेत्राला पाणी कमी पडून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ देण्यात येतो. या योजनेमधील लॉटरी पद्धत बंद करून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला अश्या सर्वच अर्जदारांना शेततळे देण्यात येईल असा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे.

कोरोना काळामध्ये 2 वर्षे वैयक्तिक शेततळे देण्याची योजना बंद करण्यात आली होती. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या बरोबर काही आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुन्हा सुरु केल्याची घोषणा केली आहे. शिवाय, शेततळे पूर्ण झाल्यानंतर अर्जदार शेतकऱ्याला प्लास्टिक आवरणाच्या अस्तरीकरणासाठी स्वतंत्ररीत्या अर्ज करावा लागणार असून त्यासाठी ७५ हजारांपर्यंत अनुदान देण्यात येते.

लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला बॅंक खात्याशी आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत बंधनकारक आहे. शेततळे मंजूर झाल्यावर तीन महिन्याच्या आत शेततळ्याचे काम पूर्ण करावे, अशी अट आहे. वैयक्तिक शेततळ्याचे एकूण आठ प्रकार असून करिता २० ते ७५ हजारांपर्यंत अनुदान देण्यात येते.

अर्ज करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्यात येतो. या योजने माध्यमातून मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असून आता लॉटरी पद्धत बंद करून परत्येक अर्जदार शेतकऱ्याला शेततळे मिळणार आहे. – सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

कृषी विभागाकडे तब्बल एक लाखांवर अर्ज

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी सद्य:स्थितीत कृषी विभागाकडे राज्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त आहेत. त्यातील अनेक शेतकऱ्यांना आता शेततळ्याची गरज नाही. त्यामुळे त्या अर्जांची छाननी करून ज्या शेतकऱ्यांना शेततळे पाहिजेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. त्यानुसार त्यांना टप्प्याटप्याने लाभ दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या जमिनीची तांत्रिक पडताळणी होऊन त्यांना मंजुरीचे आदेश देण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

  • वैयक्तिक शेततळ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
    • जमिनीचा सात-बारा उतारा (शेतकऱ्याच्या नावे किमान ६० गुंठे जमीन असावी)
    • लाभधारक शेतकऱ्याचे आधारकार्ड बंधनकारक
    • बॅंक पासबुक आणि हमीपत्राचेही बंधन
    • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला द्यावा लागणार

Similar Posts