औरंगाबाद मध्ये किराणा दुकानात चालणाऱ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश..

तब्बल 1 कोटी 8 लाख 50 हजारांची बेहिशेबी रक्कम जप्त..

औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला किराणा दुकानामध्ये सुरू असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. शहागंज परिसरातील चेलिपुरा परिसरात असलेल्या सुरेश राईस नावाच्या किराणा दुकानामध्ये सुरू असलेल्या हवाला रॅकेट बद्दल शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाली.

शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या त्या माहितीच्या आधारावर सुरेश राईस किराणा दुकानात काल रात्री धाड टाकून आणि हवाला रॅकेटचा पर्दाफाश करून तब्बल 1 कोटी 8 लाख 50 हजारांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपी आशिष सावजी याला ताब्यात घेण्यात आले आहे..

किराणा सामानाच्या मागे लपवली नोटांची बंडलं

सविस्तर माहिती अशी की, शहागंज – चेलीपुरा या रस्त्यावर सुरेश राईस या तांदळाच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार चालत असल्याची माहिती औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्या मिळालेल्या माहितीनुसार, स. पो. आयुक्त विशाल ढुमे, पो. नि. अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके व त्यांच्या पथकाने दिवसभर सुरेश राईस या दुकानाच्या बाहेर पाळत ठेवली. अनेकजण कोणतेही सामान न घेता दुकानामध्ये ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सायंकाळी पोलिसांच्या पथकाने दुकानावर छापा मारून झाडाझडती घेतली असता दुकानामध्ये समोर किराणा सामान आणि मागे नोटांची बंडले ठेवल्याचे दिसून आले. पोलीसांनी केलेल्या शोधाशोध मध्ये त्यांना, पैसै मोजण्याच्या मशीन सोबत दोन डायऱ्या मिळून आल्या.

पुढील तपास GST आणि INCOM TAX विभाग करणार

दुकानामध्ये सापडलेल्या पैशाचा पुढील तपास GST आणि INCOM TAX विभाग करणार आहे की, एवढे पैसे कुठून आले, कोठे जात होते, याविषयी पुढील दोन दिवसात तपास केली जाईल, असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Similar Posts