पत्नीने ‘अशी धमकी’ दिल्यास तो पतीवरील अत्याचार मानला जाईल’,- उच्च न्यायालय.

देशातील न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घटस्फोटाच्या प्रकरणांची सुनावणी होते. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातही अशाच प्रकारची सुनावणी झाली.

यादरम्यान न्यायमूर्ती रितू बाहरी आणि न्यायमूर्ती मीनाक्षी आय मेहता यांच्या खंडपीठाने पंचकुलाच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत पतीची घटस्फोटाची मागणी मंजूर केली. यादरम्यान, उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर एखाद्या महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध पोलिसांकडे वारंवार तक्रार केली किंवा आत्महत्येची धमकी दिली, तर तो पतीवर अत्याचाराचा प्रकार आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सांगितले की, पत्नीने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेतली तरी पतीला त्रास होतो. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की, पती-पत्नीचे 7 वर्षे वेगळे राहण्याचे प्रकरण आहे. अशा परिस्थितीत या विवाहाला निष्क्रिय म्हणता येईल. या आधारावर पतीच्या घटस्फोटाच्या मागणीला हायकोर्टाने परवानगी दिली आहे.

पतीने केले होते आरोप

पतीने अर्जात म्हटले होते की, 26 सप्टेंबर 2014 रोजी त्यांचे लग्न झाले होते. या जोडप्याला मूलबाळ नाही. त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत आहे. माहेरी गेल्यानंतर खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचे त्याने याचिकेत म्हटले आहे. तसेच वारंवार आत्महत्येची धमकी देत होती. पत्नीने 2 मार्च 2015 रोजी क्राइम अगेन्स्ट वुमन सेलमध्ये आई, बहीण आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पण नंतर ती म्हणाली की मला तक्रार चालू ठेवायची नाही. या प्रकरणात प्रत्येकाला 5 वेळा पोलिसांसमोर हजर व्हावे लागले.

पत्नीने सर्व आरोप खोटे सांगितले

पतीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने नंतर त्याच्याविरुद्ध अंबालाच्या एसीपीकडे तक्रार केली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटकही केली. तसेच, त्याला 6 वेळा कोर्टात हजर व्हावे लागले. त्यानंतर पत्नीने न्यायालयात कोणतेही म्हणणे न दिल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पत्नीच्या वतीने क्राइम अगेन्स्ट वुमन सेलमध्ये नंतर वारंवार तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे त्याचा त्रास सुरूच होता. यासोबतच पत्नीनेही उच्च न्यायालयात जबाब दाखल केला आहे. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हुंड्यात त्याच्याकडून कारचीही मागणी करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!