वैजापूर रोडवर साप-मुंगुसाच्या लढाईचा ‘लाईव्ह’ थरार व्हायरल..!
साप आणि मुंगूस या दोघांचंही शत्रूत्व सर्वज्ञात आहे. हे दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जातात. हे दोन्ही प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात प्राणघातक झुंज होणार म्हणजे होणारच यात तिळमात्र शंका नाही. अशाच एका झुंजीचा लाईव्ह थरार औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर रस्त्यावर पाहायला मिळाला.
रस्त्याच्या मधोमध साप आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरु झाली. विशेष म्हणजे या झुंजीचा थरार पाहून रस्त्यावरील वाहतूकही काही काळ थांबली आणि ही लढाई पाहू लागली. या लढाईमधील मुंगुस लहान दिसत होतं आणि नाग मात्र चांगलाच ताकदवान वाटत होता. अश्या विषम वाटणाऱ्या लढाईतसुद्धा मुंगसाने सापाला अगदी जेरीस आणलं होतं. त्यांची ही लढाई पाहून पाहून रस्त्यावरील लोकांनी तोंडात बोट घातलं आणि मुंगसाच्या शिकारी कौशल्याचं कौतुक केलं.
विशेष म्हणजे मुंगुस आणि सापाची ही झुंज एकतर्फी नव्हतीच मुळी. मुंगसाने अनेकदा सापाच्या तोंडावर हल्ला करत त्याला चावे घेतले, यावर प्रत्युत्तर म्हणून सपने सुद्धा मुंगसाला आपला फणा दाखवत आव्हान देऊन दंश करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तर या या सपने मुंगसाला अक्षरशः पिटाळून लावले होते. मात्र, या लढाईत हार मानेल तो मुंगुस कसला.
शेवटी मुंगसाने सापावर विजय मिळवलाच
थोडीशी माघार घेऊन मुंगुस पुन्हा सलवार चाल करुन गेलं. असा प्रकार तीन-चार वेळेस घडला. मात्र, प्रत्येक हल्ल्यामध्ये मुंगसाने सापाला जखमी करत हतबल केलं. उपस्थितांनी ही मुंगुस-सापाची लढाई मोबाईलमध्येही टिपली.
ही झुंज बघण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूंनी गर्दी
भर दिवसा ही लढाई सुरू असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघ्यांची गर्दी सुद्धा जमली होती. मात्र या दोघांनाही इतरांचे काही एक देणे-घेणे नव्हते. दोघंही लढाईत मग्न होते. अखेर मुंगूस आणि सापाच्या या चित्तथरारक लढाईत मुंगसाने विजय प्राप्त करत सापाचा फडशा पाडला.
पाहा व्हिडिओ..