मराठा मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया (Maratha Kunbi Certificate)
“मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi Certificate) कसे काढावे, लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, कुणबी पुरावा व वंशावळ याबद्दल संपूर्ण माहिती येथे वाचा.”
मराठा आरक्षण आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi Certificate) मिळवणे सोपे केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवल्यास तुम्हाला शैक्षणिक, नोकरी व विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो.
मित्रांनो आजच्या या लेखात आपण “कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे?”, “कुणबी दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे” आणि “कुणबी पुरावा कसा मिळवायचा” या विषयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कुणबी प्रमाणपत्र कसे काढाल? (How to Apply for Kunbi Certificate Online)
- सर्वप्रथम आपले सरकार सेवा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो
- त्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या तहसील कार्यालयात पाठवला जातो
- सर्व कागदपत्रे योग्य असल्यास उपविभागीय अधिकारी (SDO) अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतात
- या प्रक्रियेस साधारणतः 21 ते 45 दिवसांचा कालावधी लागू शकतो.
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Required Documents)
- शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड सर्टिफिकेट
- अर्जदार आणि रक्तसंबंधातील नातेवाईक दोघांवर जन्मतारीख व जन्मस्थान असणे आवश्यक
- ओळखपत्र (Identity Proof – खालीलपैकी कोणतेही एक)
- आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
- पत्त्याचा पुरावा (Address Proof – खालीलपैकी कोणतेही एक)
- रेशन कार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, 7/12 किंवा 8 अ उतारा, पाणीपट्टी
- विहीत नमुन्यातील अर्ज + ₹10 कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट + अर्जदाराचा फोटो
- शपथपत्र – ₹100 स्टॅम्प पेपरवर अर्जदार व नातेवाईकाचा कुणबी असल्याचा पुरावा
कुणबी असल्याचा पुरावा कसा मिळवायचा? (How to Get Proof of Kunbi Caste)
- शासनाने निश्चित केलेल्या 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी जन्म झालेल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकाचा कुणबी जात असल्याचे दाखला आवश्यक
- रक्तनातेवाईक म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा, चुलते, आत्या, वडिलांचे चुलते, आजोबांचे चुलते इ.
- वंशावळ काढून नातेसंबंध सिद्ध करणे आवश्यक
कुणबी पुरावा मिळवण्याचे इतर पर्याय (Alternative Records for Kunbi Proof)
- गाव नमुना क्रमांक 14 किंवा कोतवाल बुक मधील नोंदी तपासाव्यात
- वारस नोंदी (6D), जमीन वाटप नोंदी, 7/12, 8अ, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, हक्कपत्रक यासारख्या जुन्या महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी उल्लेख असल्यास त्याची प्रत घ्यावी
- छाननी समितीने वैध ठरवलेले कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्रही ग्राह्य धरले जाते
अर्ज प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप (Step by Step Process for Kunbi Certificate)
- महाऑनलाईनच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या लिंकवर अर्ज करा
- अर्जासोबत वंशावळ, जातीचा पुरावा, टीसी, शपथपत्र जोडा
- अर्ज केल्यावर तहसील कार्यालयात त्या अर्जाची छाननी होते; त्रुटी असल्यास कळवले जाते
- त्रुटी नसल्यास ग्रामस्तरीय समितीचा अभिप्राय घेतला जातो
- उपविभागीय अधिकारी (SDO) अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतात
निष्कर्ष (Conclusion)
मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवणे आता तुलनेने सोपे झाले आहे. Aaple Sarkar Portal द्वारे अर्ज करून योग्य कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण केल्यास 21–45 दिवसांत प्रमाणपत्र मिळू शकते. या प्रमाणपत्रामुळे आरक्षण व सरकारी योजनांचे अनेक फायदे घेता येतात.

