महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती, ‘या’ सार्वजनिक ठिकाणांचा समावेश

राज्यातील कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने नागरिकांना मोकळी जागा सोडून इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही सूचना जारी करतांना आता ‘रेल्वे, बस, कार्यालये, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यांसारख्या सार्वजनिक स्थळी मास्क लावणे आवश्यक असल्याचं म्हटलंय.

राज्यातील कोरोनाचे केंद्राला टेन्शन; पत्राद्वारे दिल्या सूचना

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने काल शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना टेस्टिंग वाढवण्याचे निर्देश केलं आहे.
सध्या नविन व्हायरसची संख्या वाढत असल्यामुळे राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लावणार असल्याचे स्पष्ट केलंय.

‘वारंवार सूचना देऊनसुद्धा राज्यामधील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 1 जूनच्या आकडेवारीप्रमाणे 26 जिल्ह्यांत घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येमध्ये मोठी कमतरता असून ही मोठी चिंतेची बाब असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचं प्रमाण तत्काळ वाढवावं’, असं पत्रात म्हटलं आहे.

कुठे-कुठे असणार मास्क सक्ती ?

रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे.

केंद्राच्या पत्रानंतर राज्यामध्ये हालचालींना वेग

दोन दिवसां-पासून राज्यात दररोज 3 हजारांच्यावर कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्य प्रशासन सतर्क झाले आहे.

राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून सदरील ठिकाणी टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्यावर अधिक भर देण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीपजी व्यास यांना पत्र पाठवून वरील सूचना केल्या आहेत. त्यानंतर व्यास यांनी स्थानिक आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

Similar Posts