अरे असं कसं ? भांडे ठेवलं कि गाय आपोआप दूध देते
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एका गाईचा दूध देत असतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मगन भारूड नावाच्या शेतकऱ्याची ही गाय भांडे ठेवलं कि गाय आपोआप दूध देते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार होतोय.
सहा महिन्यापूर्वी मगन भारूड यांनी ही गाय विकत घेतल्यानंतर ती गाय आजारी पडली असता सगळेच जण ती गाय विकून टाका असे म्हणायला लागले. पण मगन भारूड यांनी ती गाय विकली नाही.
आणि आज तीच गाय भांडे लावलं कि आपोआप दूध देते. गाईच्या सडामधून आपोआप दूध येतं. ही गाय दिवस भरातून 10-12 लिटर दूध देते असं मगन भारूड सांगतात. आपोआप दूध निघत असल्याने सर्वत्र या गाईची चर्चा होत आहे..