मुलीचा विनयभंग; शिक्षकाला बाईने दप्तराने झोडपलं तर गावकऱ्यांनी लाथाने तुडवलं..

कोल्हापुर मध्ये एका शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शाळेच्या शिक्षिकेसह गावकऱ्यांनी शिक्षकाला शाळेच्या वर्गातच त्याला पायाखाली तुडवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यामधील शिवाजीनगर परिसरातील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. शाळेत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या 40 वर्षीय आरोपीने पीडित मुलीला शाळेच्या शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. पोलिसांनी आरोपीला अटकही केली. पण ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे.

पीडित मुलीनं ही माहिती आपल्या आई वडिलांना सांगितल्यावर पालकांसह गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला चांगलंच झोडपले. यावेळेस घटनास्थळी असणाऱ्या काही जणांनी सदरील घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट करून सोशल मिडियावर व्हायरल केला असून या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काही जण नराधम आरोपी शिक्षकाच्या पायाला धरून ओढत आहेत. तर काहीजण त्याला लाथा बुक्क्यांनी मारत आहेत. यावेळी शाळेतील बाईंनी देखील दप्तराने शिक्षकाला चांगलाच चोप दिला. विनयभंगासारखा घाणेरडा प्रकार शिक्षकानेच केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी शिक्षकाच्या विरोधात अद्यापही तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी पण व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

लाथा-बुक्क्यांनी दिला चोप.

गावकऱ्यांनी शिक्षकाला मारत असतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये अनेक जण शिक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!