49 हजारांचे कुंडल, 20 हजाराची रुद्राक्ष माळा, रिव्हॉल्व्हर-रायफलही; जाणून घ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपत्ती किती?

योगी आता करोडपती झाले, सीएम झाल्यानंतर किती वाढली संपत्ती जाणून घ्या.. गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार करण्यात आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान, त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, योगी यांच्या संपत्तीत गेल्या चार वर्षांत सुमारे 59 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. एमएलसी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची मालमत्ता…

औरंगाबाद जिल्ह्यामधील आजची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 467 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू चार हजार 412 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 467 जणांना (मनपा 385, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 956 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची…

लज्जास्पद! महिलेवर तिच्याच मुलासमोर केला आळीपाळीने बलात्कार.

तब्बल दीड महिने एका खोलीत डांबून ठेवून महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या संभाजी आसाराम शिंदे असे आरोपीचे नाव असून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तुला व तुझ्या मुलाला कंपनीत कामाला लावून देतो, अशे सांगत सदर महिलेला तब्बल दीड महिना क्रांती चौक परिसरातील खोलीमध्ये डांबून दोघांनी तिच्या मुलासमोरच आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली…

हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची.

कन्नड तालुक्यातील औराळा इथे हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले. कन्नड तालुक्यातील औराळा येथे मा. आ. हर्षवर्धन जाधव…

फास्टॅग बंद होणार ? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आता ‘या’ पद्धतीने घेतला जाईल टोल..

आता लवकरच टोल टॅक्स थेट बँक खात्यातून जीपीएसद्वारे वसूल केला जाणार असून संसदीय समितीने टोल वसुलीसाठी वाहनांमध्ये लावलेले फास्टॅग काढण्याची शिफारस केली आहे. फास्टॅगच्या ऑनलाइन रिचार्ज संबंधी माहिती नसलेल्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. संसदीय समितीच्या या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. टी.जी. व्यंकटेश (संसद परिवहन आणि पर्यटनविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष) यांनी बुधवारी…

🤝🏻 चालू खानावळ (मेस) व्यवसाय चालवण्यासाठी पार्टनर पाहिजे आहे.

💁🏻‍♂️ शिक्षण, व्यवसाय, नोकरी, कामानिमित्त शहरात राहणाऱ्या तरुण-तरुणींपुढे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची, ही सर्वांत मोठी समस्या असते. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश जणांना दररोज हॉटेलमधील महागडे जेवण परवडणारे नसते. अशांना खाणावळीचा पर्याय असतो. त्यातच त्यांना स्वस्तात मस्त, दर्जेदार भोजन (food)देणारी खाणावळ हवी असते. 🙋🏻‍♂️अशीच औरंगाबाद शहरात दर्जेदार जेवण देणारी व चालू स्थितीत असलेली खानावळचा (मेसचा)…

गोष्ट रुपयाची- शिक्का ते नाणे आणि नोट ते आता डिजिटल करन्सी, मी कसा बदललो..

वर्षानुवर्षे मी या खिशातून त्या खिशात आणि त्या खिशातून पुन्हा दुसऱ्याच्या खिशात जात आहे. माझ्याशिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत नाही. माझे रूप बदलू शकते, माझे चिन्ह बदलू शकते, व्यवहार रूप बदलू शकतो, मार्ग बदलू शकतो परंतु माझ्या अस्तित्वावर कोणी प्रश्न विचारू शकत नाही. वेगवेगळ्या देशांमध्ये माझे नाव वेगळे आहे. कुठे डॉलरवर, कुठे रुपयावर, कुठे रियालवर,…

हिंदुविरोधी वक्तव्याच्या रागातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; आरोपींना अटक..

उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी केला धक्कादायक खुलासा. मेरठ : AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबाराचे प्रकरण जोर धरत आहे. या घटनेनंतर ओवेसी यांनी जिथे हा सुनियोजित कट असल्याचे वर्णन केले आहे, तिथेच हल्लेखोरांनी गोळीबाराचे कारण सांगून संपूर्ण पोलीस विभागाला चकित केले आहे. हल्लेखोरांच्या मनात कोणता द्वेष वाढला होता,…

दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 03 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 332 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 803 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर चार हजार 582 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 803 जणांना (मनपा 485, ग्रामीण 318 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 489 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 332…

आता जमिनीचा सुद्धा असेल आधार क्रमांक; जाणून घ्या काय होणार फायदे..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की सरकारने मार्च 2023 पर्यंत देशभरातील जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील नागरिकांच्या आधारकार्डप्रमाणेच आता तुमच्या जमिनीचाही आधार क्रमांक दिला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. वन नेशन, वन नोंदणी कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार जमिनींसाठी एक अद्वितीय नोंदणीकृत क्रमांक जारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार…