कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याकडून 1 हजार कोटींचा दावा ..
औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या दिलीप लुणावत नामक पित्याने आपल्या मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला असून एक हजार कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार या बरोबरच लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे पार्टनर बिलगेट्स यांनाही…