फ्लॅट-धारकांना पार्किंगची जागा विकणे बेकायदेशीर; यासंबधीचे अधिकार फक्त सोसायटीला..

रहिवासी सोसायट्यांतील पार्किंगची जागा पूर्णपणे त्या सोसायटीच्या मालकीची असते. त्यामुळे बिल्डरला पार्किंगची मोकळी जागा कोणत्याही सदनिकाधारकाला विकता येऊ शकत नाही. बिल्डरने सदनिकाधारकाला पार्किंगची जागा विकने हे बेकायदेशीर असून याबाबत सदनिका धारकांमध्ये जागृती व्हावी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तर्फे मोहिम राबवण्यात येत आहे.

बिल्डरला सोसायटीची जागा विकता येणार नाही असा कायदा १९६३ मध्येच झाला असून सदरील जागा ही सोसायटीच्या मालकीची असते. तसेच पार्किंगच्या जागेसंबधीचा निर्णय घेण्याचा अधिकार सोसायटीलाच असतो. जागेचे स्लॉट किती? त्यासाठी किती शुल्क घ्यायचे? यासंबधी निर्णय फक्त सोसायटीलाच घेण्याचे अधिकार आहेत. बिल्डर यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही असे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.

आजकाल बिल्डर सदनिका विकताना पार्किंगची जागा विकतात किंवा देऊ असे सांगतात. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, बांधकाम व्यावसायिकाला पार्किंगची जागा सदनिका-धारकाला विकने हे बेकायदेशीर असून हे सोसायटीच्या अधिकारावर झालेले अतिक्रमण आहे. आणि विशेष म्हणजे ज्या सदनिका-धारकांनी अशा जागेसाठी बिल्डरला पैसे दिले आहेत. ते त्यांना परत मागता येतात. असेही ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.

Similar Posts