बापरे..! औरंगाबादेत पेट्रोलपाठोपाठ डिझेल देखील शंभरीपार..

महाराष्ट्रात पेट्रोलनंतर डिझेलसुद्धा शंभरीपार झाले आहे. राज्यात औरंगाबाद शहरामध्ये डिझेलचा दर सर्वाधिक 100.13 रु एवढा झाला आहे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी पेट्रोलवर 3 तर डिझेलवर 2 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागतो. त्यामुळे औरंगाबाद शहरातील दर हे इतर शहरांपेक्षा जास्त असतात.

सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं.

मागील सात दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेल मध्ये दरवाढ होत असून आज पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झाले असून गेल्या 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रू. महाग झालंय. आधीच महागाईत वाढ होत असताना त्यात अधिक भर पडणार आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

22 मार्चपासून दररोज पेट्रोल-डिझेलचे दरवाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवस आद दरांमध्ये वाढ होत आहे. आजच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महाग झाले आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर

औरंगाबाद : पेट्रोल -( Petrol) – 115.83
डिझेल – (Diesel) – 100.13

पुणे : पेट्रोल – ( Petrol) -113.69
डिझेल – (Diesel) – 96.56

नाशिक : पेट्रोल -( Petrol) -114.60
डिझेल – (Diesel) – 97.43

अमरावती : पेट्रोल -( Petrol) -115.68
डिझेल – (Diesel) -100.01

परभणी : पेट्रोल – ( Petrol) – 117.24
डिझेल – (Diesel) – 99.97

कोल्हापूर : पेट्रोल – ( Petrol) – 114.27
डिझेल – (Diesel) – 97.14

रायगड : पेट्रोल – ( Petrol) – 114.29
डिझेल – (Diesel) – 97.11

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!