अजिंठा घाटामध्ये बस ने घेतला पेट; सर्व 56 प्रवासी सुखरूप..

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचा घाट वर चढून आलेल्या औरंगाबाद-मुक्ताईनगर ST बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर आगाराची MH 14 BT 1652 क्रमांकाची मुक्ताईनगर -औरंगाबाद ही बस अजिंठा घाटच्या वर आली असता पोलीस वायरलेस जवळच्या वळणापाशी चालकाच्या कॅबिनमध्ये अचानक पेट घेतला.

प्रसंगावधान राखत बस मधील सर्व 56 प्रवाशी खाली उतरविण्यात आल्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. पोलीस व ग्रामस्थांनी टँकरच्या साह्याने आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!