PM Kisan eKYC | पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ झाली की नाही असं चेक करा मोबाईलवर

PM Kisan eKYC

PM Kisan eKYC Mobile: शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपये तीन टप्प्यांत दिले जातात. आतापर्यंत या योजनेत 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असून, लवकरच 12 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे समजते.. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोदी शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ करणं गरजेचं आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी मोदी सरकारने ‘ई-केवायसी’चा निर्णय घेतला आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेत ‘ई-केवायसी’ केलेली नसेल, अशा शेतकऱ्यांना 12 वा हप्ता दिल्या जाणार नाही, असे सांगण्यात आले.

अनेक दिवसांपासून ‘ई-केवायसी’ करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ केली नाही. ज्या शेतकऱ्यांची ‘ई-केवायसी’ राहिलेली आहे त्यांना 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाही. असा मोदी सरकारकडून सूचना देण्यात आली. (pm kisan kyc status check 2022)

PM Kisan eKYC ‘ई-केवायसी’ करण्यासाठी मुदतवाढ..


पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, या मुदतीत अनेक शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ केलेली नाही. यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्या होत्या. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन पुन्हा मोदी सरकारने सरकारने ‘ई-केवायसी’ करण्यासाठी 9 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.. (PM Kisan eKYC)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर या संबंधित माहिती देण्यात आली आहे. या ऑनलाईन वेबसाईटवर मोबाईल OTP द्वारेही शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ करता येणार आहे. तसेच, CSC सेंटरवर बायोमेट्रिक आधारित ‘ई-केवायसी’ ही करता येईल. घरबसल्या मोबाईलवर पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ कशी करायची व तुमची ‘ई-केवायसी’ झाली की नाही चेक करा. (pm kisan kyc)

  • पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ झाली की नाही चेक करण्यासाठी PM Kisan eKYC status check
  • ‘ई-केवायसी’ झाली की नाही असं चेक करा..
  • सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशिअल वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • यानंतर, ‘Farmer Corner’ वर क्लिक करुन ‘E-kyc’ वर जा.
  • ‘ई-केवायसी’वर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाका.
  • नंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ‘ओटीपी’ येईल.
  • OTP टाकल्यानंतर तुमची ‘ई-केवायसी’ पूर्ण होईल.
  • पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ झाली असेल, तर ‘Mobile Number Already Exist’ असा मॅसेज ओपन होईल.
  • जर तिथे ‘Get Aadhar OTP’ असा मॅसेज ओपन झाला असेल, तर तुमची ‘ई-केवायसी’ झालेली नाही. (pm kisan yojana ekyc portal)

pm kisan yojana 12 वा हप्ता या तारखेला मिळणार..


पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकार दर 4 महिन्यांच्या अंतराने एक हप्ता बँक खात्यात वर्ग करते. पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता मोदी सरकारने 31 मे 2022 रोजी दिला होता. आता 12वा हप्ता 12 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्या जाणार आहे.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!