पैशांचा पाऊस पाडण्यासाठी हॉटेलमध्ये मांडली पूजा; पण…

तुम्ही जेवढे पैसे आम्हाला देणार त्यापेक्षा दुप्पट पैशांचा पाऊस पाडून देतो’, अश्या थापा मारून भोंदू मंत्रिकासह त्याच्या साथीदारांनी गोव्याच्या महिलेसह दोघांना तब्बल ११ लाख ६२ हजारांचा गंडा घालण्याची घटना औरंगाबादेत समोर आली.

कैलास रामदास सोळुंके (वय २५ वर्षे, रा. एकतानगर, लांजी रोड) असे त्या भोंदू मांत्रिकाचे तर त्याच्या साथीदारांच्या नाव गोरख साहेबराव पवार (वय २२ वर्षे, नवीन बजार तळ कालिकानगर, शिर्डी ) आणि प्रमोद दीपक कांबळे (वय ३१ वर्षे, बौद्धनगर, जवाहर कॉलनी) अशी आहेत.

औरंगाबाद: जावेद खान नूर खान (रा. पडेगाव) यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची मानलेली बहीण पुष्पा ऊर्फ रत्नदीप बाळसो व महेश ऊर्फ शोधन निपाणीकर ( दोघे रा. गोवा) हे दोघेजण १५ जून २०२२ रोजी हे जावेदच्या घरी आले असता त्यांची ओळख प्रमोद दीपक कांबळे (रा. जवाहर कॉलनी) याच्यासोबत झाली. प्रमोदने एक मांत्रिक पैशांचा पाऊस पाडून आपण दिलेल्या पैश्याच्या दुप्पट पैसे करून देतो आणि त्या मांत्रिकाची भेट घालून देण्यासाठी ५ हजार रुपये घेऊन कांबळेने १६ जून २०२२ रोजी तिघांची भेट आरोपी मांत्रिक कैलास साळुंके याच्यासोबत घालून दिली.

भोंदू मांत्रिक कैलासने आपण पूजा करून पैशांचा पाऊस पाडू शकतो असे सांगून त्यासाठी शिर्डीला जाऊन तुम्ही दिलेल्या पैश्याच्या दुप्पट पैशांचा पाऊस पाडू हा विश्वास दिला. त्या मंत्रिकावर विश्वास बसल्यावर जावेद खान यांनी 2 लाख, पुष्पा बाळसो यांनी ५ लाख ९० हजार आणि शोधक निपनिकर यांनी २ लाख रुपये सुध्दा दिले.

त्यानंतर दोन जागी पूजा मांडून अंधारात बॅटरीच्या उजेडामध्ये नोटा उधळण्यात आल्या, मात्र तिघांना फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी गुन्हे शाखेमध्ये तक्रार दिली. तक्रार दिल्यावर गुन्हे शाखेने भोंदू मंत्रिकसह त्याच्या दोन्ही साथीदारांना शुक्रवारी दि. १५ जुलै २०२२ पहाटे जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून रोख ६० हजार रुपये, १ मोटरसायकल, २ मोबाइल असा सुमारे १,२२,००० रुपयाचा ऐवज जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!