Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले डीपी बदलण्याचे आवाहन..

स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील डिस्प्ले पिक्चर (DP) वर राष्ट्रध्वजाचा तिरंगा लावला आहे. पंतप्रधानांनी देशातील सर्व नागरिकांना तसे करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही डीपी बदलून तिरंगा लावला आहे.

2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडियावर तिरंग्याचा प्रोफाईल पिक्चर म्हणून वापर करून ‘हर घर तिरंगा’ ही जनआंदोलन बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले होते. पीएम मोदींनी ट्विट केले की, “आज 2 ऑगस्टचा दिवस खास आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा आपला देश घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांना देखील तसे करण्याचे आवाहन करत आहे.

मन की बात मध्ये केले पंतप्रधान मोदींनी आवाहन

रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडियावर तिरंग्याचा प्रोफाइल पिक्चर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले. भारत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी तयार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘हर घर तिरंगा’ मोहीम हा ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने लोकांना घरोघरी ‘तिरंगा’ फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

Similar Posts