घर खरेदी करतांना खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, नाही होणार फसवणूक..

घर खरेदी करणे हे प्रत्येक नागरिकांचे एक मोठे स्वप्न असते. तुमचे सुद्धा असेच स्वप्न असेल. पण घर खरेदी करता वेळेस आपण आपल्या कमाईचा खूप मोठा हिस्सा पणाला लावतो हे मात्र नक्की.

अशावेळेस आपल्या घर खरेदीचा व्यवहार व्यवस्थित झाला पाहिजे, कागदपत्रांची कोणतीही अडचण येऊ नये आणि खास म्हणजे आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये ही प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. तुमचीदेखील अशीच इच्छा असेल. पण यासाठी तुम्ही जागरुक राहून घर खरेदी करतेवेळी काही गोष्टींची खबरदारी घेतली आणि त्यांची योग्य तपासणी केली तर तुमची आयुष्यभरची कमाई खड्ड्यामध्ये जाणार नाही.

घर खरेदी करण्यापूर्वी ही 5 महत्त्वाची कागदपत्रे तपासा आणि निश्चिंत व्हा..

● प्रॉपर्टी विकत घेण्यापूर्वी, तुम्ही खरेदी करत असलेले घर किंवा जमीन कोणत्या नियामक प्राधिकरणच्या अखत्यारीत येते किंवा नाही याची पूर्ण खात्री करा. म्हणजे मालमत्ता महानगरपालिका, नगरपालिका या सारख्या प्राधिकरणाच्या मर्यादेमध्ये येते की नाही हे तपासून घ्या. कित्येक वेळा हद्दीमधील किंवा हद्दीजवळच्या घर किंवा जमीनसंदर्भात काही गुंतागुंती असते. आणि व्यवहार करत असताना ही बाब पाहिली जात नाही आणि नंतर डोक्याला हात लावायची वेळ येते.

● तसेच हे देखील जाणून घेणे अती आवश्यक आहे कि तुम्ही तुमचे स्वप्नामधील जे घर खरेदी करणार आहात त्यासाठी संबंधित प्राधिकरणाची संपूर्ण मंजूरी मिळाली आहेत की नाही? याशिवाय बिल्डर कडे टायटल डीड, रिलीझ प्रमाणपत्र, मालमत्ता कराची पावती, अग्निशमनची मंजूरी अशी प्रकल्पाची सर्व कागदपत्रे आहेत ना, हे सुद्धा पाहाच. ही सर्व खूप महत्त्वाची कागदपत्रे आहेत आणि ती तुम्ही तपासलीच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जमिनीच्या वापरासाठी पडताळणी आणि RERA प्रमाणपत्र देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

● अजून एक महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे बांधकाम मंजुरी प्रमाणपत्र. तुम्ही विकास-काकडून बांधकामाधीन मालमत्ता विकत घेत असताना हा दस्तऐवज अनिवार्य आहे. तो फ्लॅट बिल्डरचा, जमीन किंवा घर असू शकतो. या प्रमाणपत्रामध्ये स्थानिक प्रशासनाकडून किंवा प्राधिकरणांकडून आवश्यक मान्यता, परवाने आणि परवानग्या मिळाल्यानंतरच बांधकाम सुरू केल्याचा पुरावा असतो.

● जर तुम्ही मेट्रो कनेक्टिव्हिटीजवळ किंवा कोणत्याही मोठ्या प्रकल्पाजवळ गुंतवणूक करत आहात तर भविष्यामध्ये तुमच्या मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्हाला त्यातून नक्कीच चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय तुम्ही घेतलेल्या प्रॉपर्टीजवळ घाण पसरवणारा उद्योग धंदा तर नाही ना हे सुद्धा नक्की पाहावे. याबरोबरच तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीमध्ये शाळा, हॉस्पिटल यासारख्या सुविधा आहेत की नाही हे देखील तपासा.

● प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यावरच स्थानिक अधिकाऱ्यांकडून हे प्रमाणपत्र दिला जाते. आणि यावरून हे सिद्ध होते की सदरील मालमत्ता कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत नाही. त्यामध्ये पाणी, सांडपाणी आणि वीज जोडण्यांशी संबंधित माहितीही असते. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळालेले आहे की नाही याची खातरजमा अवश्य करून घ्या.

आणि एकदा का तुम्ही ही सर्व कागदपत्रे तपासलीत की स्वप्नातील घराची खरेदी तुम्ही निश्चिंतपणे करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!