महिलेवर अत्याचार करून त्या अत्याचाराचा व्हिडीओ गावात व्हायरल केला..

सोयगाव तालुक्यामधील घोसला या गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेला त्याच्या मुलास आणि भावास जीवे मारुन टाकण्याची धमकी देऊन एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. शिवाय अत्याचाराचा व्हिडीओ बनवून गावात व्हायरल केला. त्यांनतर महिलेच्या भावाने केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून त्या महिलेच्या पोटावर बिबा रगडून तिची त्वचा सुद्धा जाळल्याची संतापदायक घटना घोसला या गावात १० जून २०२२ रोजी रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. तर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आबा अंबादास कोळी (रा. घोसला, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला एका लग्नसमारंभातून घरी परतत असताना आबा अंबादास कोळी याने दुचाकी आडवी लावून तिचा रस्ता अडवला व तिला तिच्या बहिणीच्या घरी सोडून देतो असे सांगितले. मात्र पिडित महिलेने नकार दिला. त्यामुळे महिलेला तिच्या मुलाला आणि भावाला ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने दुचाकीवर बसवले. यानंतर १२ किलामीटर लांब असलेल्या घोसला (ता. सोयगाव) गावातील त्याच्या शेतात घेऊन गेला. त्यांनतर महिलेवर अत्याचार केला. तसेच अत्याचार करतानाचा व्हिडीओ स्वत:च्या मोबाइलमध्ये तयार करून ठेवला.

व्हिडीओ केला समाज माध्यमांवर व्हायरल…

आरोपी आबा अंबादास कोळीने पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती प्रचंड घाबरून गेली. त्यामुळे घडलेला प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही. मात्र त्यांनतर ४ दिवसांनी आरोपीने गावातील लोकांच्या मोबाईलवर अत्याचाराच्या व्हिडिओ व्हायरल केला. पाहता-पाहता हा व्हिडिओ संपूर्ण गावात व्हायरल झाला. हा व्हिडिओ महिलेच्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत सुद्धा पोहचल्यावर महिलेच्या कुटुंबीयांनी तीला विश्वासात घेऊन विचारली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.

पिडित महिला मानसिक तनावाखाली?

मुलाला आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देत पिडीत महिलेवर अत्याचार करण्यात आल्यामुळे पिडित महिला प्रचंड तणावाखाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कुटुंबातील लोकांनी तिला धीर देत विश्वासात घेऊन घडलेला प्रकार जाणून घेतला. मात्र आपला व्हिडिओ व्हायरल झाल्याने महिला प्रचंड घाबरलेली आहे.

Similar Posts