औरंगाबाद मधील व्यापाऱ्याचे सहा लाखाचे सोन्याचे दागीने लुटणारे आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात, जबरी चोरीचा गुन्हा आठ तासात उघड.
काल दिनांक 16/03/2022 रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या माहीती वरुन, दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेची CCTV फुटेज बातमीदार यांना दाखविले असता, गुप्त बातमीदारा मार्फत सदर ठिकाणी रिअल इस्टेट ब्रोकर अशोक शंकर पाटील यांचे गळयातील सोन्याच्या चैन इसम नामे 1 ) महिला नामे रचना तुळशिराम निंभोरे, रा. भाग्योदय नगर, चाटे स्कुल जवळ, सातारा परिसर, औरंगाबाद 2 ) रोहित विठ्ठल बोर्डे, रा. फुले नगर, गल्ली नंबर 03, उस्मानपुरा, औरंगाबाद यांने त्याचा मित्र व या तीघांनी मिळुन जबरी चोरी करुन घेवून गेले आहे. व त्यातील रोहित बोर्डे हा त्याचे राहते घरी गल्ली नंबर 03 , उस्मानपुरा औरंगाबाद येथे असल्याची माहीती मिळाली.
त्यावरुन सदरची माहीती वरीष्ठांना देवुन स.पो.नि. मनोज शिंदे यांनी त्यांच्या पथकासह बातमीच्या ठिकाणी जावुन रोहीत विठ्ठल बोर्डे यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यास विश्वासात घेवून विचारपुस असता सदर गुन्ह्यातील फिर्यादी अशोक शंकर पाटील, रा. समर्थनगर, औरंगाबाद यांचे गळ्यातील सोने जबरीने चोरुन नेण्या करीता रचना निंभोर हिने तीचा मित्र नदीम खॉन नजीर खॉन रा. शम्स नगर, शहानुरवाडी याच्या मार्फतीने सुपारी दिली होती. व काम झाल्यास मिळालेल्या सोन्यापैकी 40 % रचना निंभोरे, 20 % नदीम खॉन व 40 % मला अशी वाटणी ठरली.
त्यावरुन दिनांक 16/03/2022 रोजी 2 ते 2.30 वाजे दरम्यान ठरल्या प्रमाणे रचना निंभोरे ही अशोक पाटील यांचे मोहटाई रियल इस्टेट ऑफीस स्कायलाईन पार्क बिल्डींग. शॉप नं .1 समर्थनगर, औरंगाबाद येथे अशोक पाटील यांना भेटण्याकरीता गेली, तिने ठरल्या प्रमाणे रोहीत विठ्ठल बोर्डे याला फोन केला असता रोहीत व त्याचा मित्र विवेक अनिल गंगावणे, वय 19 वर्ष, रा. फुले नगर, उस्मानपुरा असे मिळुन सदर ठिकाणी गेले व अशोक पाटील यास मारहाण करुन त्यांच्या गळयातील सोन्याच्या चैन जबरीने ओढुन घेऊन गेलो. असे सांगुन रोहितने त्याच्या राहत्या घराचे कपाटातुन
1 ) 1,03,650/- रुपये किंमतीची 20.73 ग्रॅम वजनाची कडयाची डिझाईन असलेली तुटलेली सोन्याची चैन, 2 ) 1,13,600/- रुपये किंमतीची 22.72 ग्रॅम वजनाची फुला फुलाचा गोफ असलेल सोन्याची तुटलेली चैन, 3 ) 2,17,800/- रुपये किंमतीची 43.56 ग्रॅम वजनाची चौकोणी कडयाची डिझाईन असलेली सोन्याची तुटलेली चैन, 4 ) 1,14,150/- रुपये किंमतीची 22.83 ग्रॅम वजनाची गोफची डिझाईन असलेली सोन्याची तुटलेली चैन असा एकुण 5,49,200/- रुपये किंमतीचा एकुण 109.84 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे काढून दिले, व ते पोलिसांनी जप्त केले आहे.
तसेच त्यानंतर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2 ) रोहित विठ्ठल बोर्डे रा. फुले नगर, गल्ली नंबर 03, उस्मानपुरा, औरंगाबाद 3) विवेक अनिल गंगावणे वय 19 वर्ष रा. ग. नं. 3 उस्मानपुरा, औरंगाबाद, ४ ) नदीम खान नजीर खान रा. शम्स कॉलनी, शहानुरवाडी, औरंगाबाद यांना मुद्येमालासह पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे येथे मुद्देमालासह हजर करुन जबरी चोरीचा गुन्हा आठ तासाचे आत उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. डॉ. निखिल गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त, ( मुख्यालय ) श्रीमती अपर्णा गिते, मा. पोलीस उप आयुक्त ( परिमंडळ । ) श्रीमती उज्वला वनकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री. विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा श्री. अविनाश आघाव यांचे मार्गदर्शाना खाली सपोनि मनोज शिंदे, स.फौ / विठ्ठल जवखेडे, सफौ / सतीश जाधव, सफौ / नजीरखा पटाण, पोह / संतोष सोनवणे, पोह / चंद्रकांत गवळी, पोह / सुधाकर मिसाळ, पोना / भगवान शिलोटे, पोना / अवलिंग होनराव पोकॉ / नितीन धुळे, पोकॉ / संदीप बीडकर, पोकॉ / विशाल पाटील, पोकॉ / विलास मुठे, पोकों / नितीन देशमुख, मपोकों / गीता ढाकणे, पोना / ज्ञानेश्वर पवार, सफौ / रमेश गायकवाड यांनी केली आहे. ( विशाल दुमे ) सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे औरंगाबाद शहर.