सरपंचाने स्वत:ची कार जाळून केला आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध; दिल्या ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा! फुलंब्रीतील घटना; पाहा व्हिडिओ..

Sarpanch burnt his own car to protest lathi charge on protesters: मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता जालना येथे आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ फुलंब्री तालुक्यात दोन ठिकाणी आंदोलन करण्यात असून राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे आज सकाळी 11:00 वाजता एका सरपंचाने आपली स्वतःच्या कार जाळून आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला.

अवघ्या वर्षभरापूर्वीच घेतली गाडी..
सरपंच मंगेश साबळे यांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करत स्वत:ची गाडी पेटवून दिल्याची माहिती समोर आली. प्राप्त माहितीनुसार, ताठ गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच ही कार घेतली होती.

मात्र, काल झालेल्या मराठा आंदोकांवरील लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे आज 11 वाजता आपल्या कारवर पेट्रोल टाकून जाळले. यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते.

…गाडीच नाही तर स्वत:ला जाळून घेऊ
प्रसार माध्यमांना प्रतिक्रीया देताना मंगेश साबळे म्हणाले, आमच्या मराठा लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची रस्त्याच्या मध्यभागी स्वतःची कार ( MH 20 FY 4964) गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला देखील जाळून घेऊन निषेध व्यक्त करु. सरकारने दोन दिवसांच्या आता ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही स्वत:ला सुद्धा जाळून घेऊ. सदरील घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंगेश साबळे व साईनाथ बेडके याना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी सकाळी 9.30 वाजेपासून सिडको बसस्थानक चौकात मराठा समाजाकडून रस्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा सर्व स्तरातून विविध मार्गाने निषध व्यक्त केला जाता आहे. राज्य सरकार व पोलिस प्रशासनाच्या हुकुमशाही धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडिओ…

Similar Posts