Search Name in Voter list 2024: तुमचे नाव मतदार यादीत आहे का का नाही? घरबसल्या फक्त दोन मिनिटात तपासा..!

Search Name in Voter list 2024 : महाराष्ट्रात निवडणुकांचा बिगुल वाजला असून आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असते. मतदार कार्ड त्याच नागरिकांना मिळते ज्यांचे नाव मतदार यादीत असते. जर मतदार यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला पुन्हा मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागायची. पण आता या सर्व गोष्टी डिजिटल झाल्या असून तुम्ही तुमच्या घरबसल्या तुमच्या मोबाइलच्या माध्यमातून तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासू शकता. आज आम्ही तुम्हाला मतदार यादीत तुमच्या बरोबरच तुमच्या परिवारातल्या सदस्यांचे नाव यादित कसे तपासायचे याची माहिती देणार आहोत.

जर तुम्ही काही दिवसांपूर्वी मतदार नोंदणी केली असले तर तुम्ही तुमचे नाव यादीत आहे का नाही हे घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता.

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी काय माहीत असावे?

Search Name in Voter list : मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून पाहण्यासाठी तुमच्या मतदार कार्डवर EPIC Number म्हणजेच Electors Photo Identification Card असतो त्याच्या मदतीने किंवा मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी तुम्हाला नाव, वय, जन्म तारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघाची माहीत असणे अत्यंत आवश्यक असते.

मतदार यादीत मध्ये नाव कसे तपासायचे ते पाहू. Search Name in Voter list

  • सर्वात आधी आपल्याला गुगल वर Voters service Portal लिहा किंवा electoralsearch.eci.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही थेट भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
  • भारत निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तीन पर्याय मिळतील.
  • पहिल्या पर्यायात तुम्ही तुमची माहिती भरुन तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासू शकता.
  • दुसऱ्या पर्यायात  search by EPIC म्हणजेच Electors Photo Identification Card नुसार तुमचे नाव शोधता येते.
  • तिसऱ्या पर्यायात तुमचा मतदार कार्ड नोंदणी करतानाचा मोबाईल नंबर टाकून तुमचे नाव मतदार यादीत शोधता येते. Search Name in Voter list
    पहिला पर्याय आहे Search by Details
  • Search by Details या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही तुमेच नाव मतदार यादीत तपासत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम राज्य निवडावे लागेल आणि भाषा निवडावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, वय, तुमचा जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ याची संपूर्ण माहीती भरावी लागेल.
  • ही माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोडद्वारे सर्च करावे लागेल. आणि अगदी काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल.

Search Name in Voter list ONLINE दुसरा पर्याय आहे Search by EPIC

  • Search by EPIC  हा पर्याय तुम्ही निवडला तर, तुम्हाला Electors Photo Identification Card क्रमांक माहित असणे गरजेचे असते. तो प्रत्येकाच्या मतदार कार्डवर असतो.
  • सर्वप्रथम राज्य निवडा आणि तुमची भाषा निवडा. Electors Photo Identification Card हा नंबर आपल्या मतदार कार्डवर असतो. तो तुमच्याकडे आधी लिहिलेला असले तर समोर दिसत असलेल्या कोष्टकात भरा. 
  • आता कॅप्चा कोड टाकून सर्च करावे लागेल. त्यानंतर काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल. Search Name in Voter list

तिसरा पर्याय आहे Search by Mobile

  • Search by Mobile या पर्यायाची निवड केल्यास तुम्हाला राज्य आणि भाषेची निवड करावी लागेल,
  • नंतर तुमचा रजीस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून send OTP नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या सर्च ऑप्शनला क्लिक करावे लागेल.
  • सर्चवर क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदात तुमचे नाव स्क्रिनवर येईल.
  • परंतु त्यासाठी आधी तुम्ही मतदार नोंदणी केलेली असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. Search Name in Voter list

Similar Posts