शिंदे सेना की शिवसेना..? एकनाथ शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांची संपूर्ण यादी वाचा…

एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत असताना दिसत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात असून आणखी सुद्धा काही आमदार शिंदें गटात सामील होणार असल्याचे चित्र समोर येत आहेत. आता नुकतीच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिंदे गटाची आमदार संख्या ५०च्या वर पोहोचणार आहे. ४२ शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे ५० जण शिंदे गटामध्ये शामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे..

भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासह १० मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह १० जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या ६ मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंबरोबर असलेल्या आणि शिवसेनेमध्ये असलेल्या आमदारांची यादी पाहूया.

एकनाथ शिंदें गटातील आमदार

▪️महेंद्र थोरवे (कर्जत)
▪️भरत गोगावले (महाड)
▪️महेंद्र दळवी (अलिबाग)
▪️अनिल बाबर (खानापूर)
▪️महेश शिंदे (कोरेगाव)
▪️शहाजी पाटील (सांगोळा)
▪️शंभूराज देसाई (पाटण)

▪️बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
▪️ज्ञानराजे चौघुले (उमरगा)
▪️रमेश बोरणारे (विजापूर)
▪️तानाजी सावंत (परांडा)
▪️संदिपान भुमरे (पैठण)
▪️अब्दुल सत्तार (सिल्लोड)
▪️नितीन देशमुख (अकोला)
▪️प्रकाश सुर्वे (मागाठणे)
▪️किशोर पाटील (जळगाव)
▪️सुहास कांदे (नांदगाव)
▪️संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
▪️प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)
▪️संजय रायुलकर (मेहकर)
▪️संजय गायकवाड (बुलढाणा)
▪️एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)
▪️विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
▪️राजकुमार पटेल (मेळघाट)

▪️शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
▪️श्रीनिवास वनगा (पालघर)
▪️प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)
▪️प्रकाश अबिटकर (राधानगरी)
▪️चिमणराव पाटील (एरंडोल)
▪️नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)
▪️लता सोनावणे (चोपडा)
▪️यामिनी जाधव (भायखळा)
▪️बालाजी किनीकर (अंबरनाथ)
▪️गुलाबराव पाटील (जळगाव)
▪️योगेश कदम (दापोली)
▪️दीपक केसरकर (सावंतवाडी)
▪️सदा सरवणकर (माहीम)
▪️मंगेश कुडाळकर (कुर्ला)
▪️दिलीप लांडे (चांदिवली)
▪️संजय राठोड (यवतमाळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!