UIDAI ने रद्द केले 6 लाख आधार कार्ड; यात तुमच्या आधार कार्डचा सुद्धा तर समावेश नाही ना…

UIDAI Aadhar Card Update: आजच्या काळात आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. मात्र गेल्या काही काळापासून आधार कार्डावर सुरू असलेल्या फसवणुकीमुळे त्याच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. आधार कार्डच्या मदतीने, एखाद्या व्यक्तीला त्यांच्या पात्रतेनुसार सरकारी सेवा सहज मिळू शकतात. http://www.india.gov.in मात्र काही काळापासून बनावट कंपन्या आधार कार्ड बनवण्यासाठी फसवणूकही करत आहेत. सरकारकडेही आधार कार्डसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. यावर कारवाई करत, आधार कार्ड जारी करणारी संस्था यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने कठोर पाऊल उचलत 5,98,999 आधार कार्डे रद्द केली आहेत. मात्र रद्द झालेल्या आधार कार्डधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

लवकरच होणार तुमच्या चेहऱ्याचे व्हेरिफिकेशन
इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत देशभरातील डुप्लिकेट आधार कार्डची समस्या दूर करण्यासाठी UIDAI सातत्याने पावले उचलत आहे. आता आधार कार्डमध्ये बनावटगिरी करणे अशक्य होणार आहे. कारण युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड जनरेट करण्यासाठी नवीन सुरक्षा फीचर घेतले आहे. आता आधार कार्डमध्ये ‘फेस’ व्हेरिफिकेशनचे फीचर जोडण्यात आले आहे. म्हणजेच आता आधार कार्ड पडताळणीसाठीही चेहरा वापरला जाणार आहे. पडताळणीसाठी आतापर्यंत फक्त बोटांचे ठसे आणि डोळे वापरले जातात. मात्र आता चेहऱ्याचीही पडताळणी होणार आहे.

11 फेक आधार बनवणाऱ्या वेबसाइट्सना केले बॅन करून पाठवली नोटीस

केंद्र आणि राज्य पातळीवर बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. आधार कार्ड बनवणाऱ्या इतर सर्व बनावट कंपन्या आणि वेबसाइट्सना नोटिसा देण्यात आल्या आहेत. आधार कार्डशी संबंधित सेवांचा दावा करणाऱ्या बनावट वेबसाइट्सना UIDAI कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच या वेबसाइट्सच्या होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हायडरला सांगण्यात आले की, त्या तात्काळ ब्लॉक करण्यात आल्या आहेत. आता आधार कार्डमध्ये खोटेपणा होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!