अजिंठा घाटामध्ये मिनी व्हॅन व आयशरच्या अपघातात पाच पर्यटक जखमी..
अजिंठा लेणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मिनी व्हॅन व आयशरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच पर्यटक जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी (दि. २) दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास फर्दापूर-अजिंठा घाटामध्ये घडली. या अपघातात पर्यटकांच्या मिनी व्हॅनच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला आहे, जखमी पर्यटकांवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. विदर्भामध्ये नागपंचमीची सुटी असल्याने…
