पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..
औरंगाबाद शहरात आज DTDC कुरिअर कंपनीमधून 3 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे दिघी येथील कुरिअर कंपनीत देखील मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आल्याने खबळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये तब्बल ९७ तलवारी, दोन कुकरी आणि ९ म्यान असा एकूण तीन लाखांपेक्षा जस्त किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे….
