इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत? ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन वाद..
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी जळगावमध्ये किर्तना दरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलंय. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा-निमित्त आयोजित केलेल्या किर्तनाच्या कार्यक्रमामध्ये महाराजांनी कोरोना कालावधीत ऑनलाइन शिक्षण घेऊन पास झालेल्या मुलांना नोकरीच मिळणार नाही, असे वक्तव्य केलंय. तसेच पगार देताना बुद्धी तपासली पाहिजेत असं सुद्धा इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय. त्यामुळे…