पत्नीने ‘अशी धमकी’ दिल्यास तो पतीवरील अत्याचार मानला जाईल’,- उच्च न्यायालय.
देशातील न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घटस्फोटाच्या प्रकरणांची सुनावणी होते. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातही अशाच प्रकारची सुनावणी झाली. यादरम्यान न्यायमूर्ती रितू बाहरी आणि न्यायमूर्ती मीनाक्षी आय मेहता यांच्या खंडपीठाने पंचकुलाच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत पतीची घटस्फोटाची मागणी मंजूर केली. यादरम्यान, उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर एखाद्या महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध पोलिसांकडे वारंवार…
