औरंगाबादेत पार्किंगसाठी ‘या’ ७ ठिकाणी हमखास मिळणार जागा; सुरुवातीची दोन महिने मोफत असणार पार्किंग..
औरंगाबाद शहराला मागील काही वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन पार्किंगचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अंत: या प्रयत्नांना यश आले असून, औरंगाबाद शहरात ७ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना याची सवय लागावी म्हणून सुरुवातीचे दोन महिने पार्किंग मोफत राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने पार्किंगचे धोरण निश्चित…