औरंगाबाद महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट भाजपासोबत लढवणार निवडणूक…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपसोबत एकत्र लढणार आहे. या संदर्भात औरंगाबाद महापालिकेबाबत दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. फक्त जागा वाटप बाकी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ म्हणाले की, लवकरच मुंबई, पुणे महापालिकेच्या निवडणुकांबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी शिंदे गट…
