औरंगाबाद महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट भाजपासोबत लढवणार निवडणूक…

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपसोबत एकत्र लढणार आहे. या संदर्भात औरंगाबाद महापालिकेबाबत दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. फक्त जागा वाटप बाकी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ म्हणाले की, लवकरच मुंबई, पुणे महापालिकेच्या निवडणुकांबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी शिंदे गट आणि भाजपची प्राथमिक बैठक झाल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

औरंगाबादचे अनेक चांगले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हिंदुत्वासाठी एकत्र निवडणुका लढवू. यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा जंजाळ यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा हिंदुत्व असेल, असे जंजाळ यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे सहाही आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आधीच अडचणीत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!