औरंगाबाद महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत केल्या 7 हजार 766 फाईल्स मंजूर.
औरंगाबाद : शहरात गेल्या 25 ते 30 वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसाहती उभ्या राहिल्या. त्या वस्त्यांमध्ये हजारो घरे बांधून लोक आपले जीवन जगत आहेत. त्या बेकायदेशीर मालमत्तांचे नियमन करण्यासाठी, महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने डिसेंबर 2020 पर्यंत सर्व अनधिकृत बांधकामे कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर औरंगाबाद महापालिकेने आतापर्यंत 7 हजार 766 फाईल्स मंजूर केल्या आहेत….
