औरंगाबादमधील महापालिका शाळा रविवारी बंद राहणार : रामनाथ थोरे
कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी रविवारीही महापालिकेच्या शाळा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालकांच्या विरोधामुळे शनिवारी अर्ध्या दिवसाऐवजी पूर्ण दिवस शाळा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे शैक्षणिक अधिकारी रामनाथ थोरे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्यात आले मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते….
