औरंगाबादमधील महापालिका शाळा रविवारी बंद राहणार : रामनाथ थोरे

कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी रविवारीही महापालिकेच्या शाळा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र पालकांच्या विरोधामुळे शनिवारी अर्ध्या दिवसाऐवजी पूर्ण दिवस शाळा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे शैक्षणिक अधिकारी रामनाथ थोरे यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्यात आले मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते. काही भागात इंटरनेट नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता हे नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नुकतीच पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत रविवारी शाळा सुरू ठेवून जादा तास घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला पालकांमधून विरोध सुरू झाला आहे. एक दिवस विद्यार्थी मोकळे व्हायला हवेत, याकडे काही पालकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता शनिवारी शाळा भरणार आहे. पुढील आठवड्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. येत्या शनिवारी शिवजयंती साजरी करण्यासाठी सुट्टी आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!