औरंगाबाद नव्हे तर आता संभाजीनगर म्हणा, कॅबिनेटमध्ये नामांतराचा प्रस्ताव मंजूर..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह दहा निर्णय मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतरासह अनेक निर्णयांचा जणू काही सपाटा लावला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मार्ग अखेर मोकळा झाला असून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद शहराचे नावही धाराशिव…