कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.
कोरोना महामारीमध्ये मनपाकडे उपचार करण्याकरिता बेड उपलब्ध नसल्यामुळे शासन आदेशाप्रमाणे औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. मात्र ज्या रुग्णालयांनी उपचारासाठी परवानगी घेतली त्या रुग्णालयांनी रुग्णांकडून बिलाच्या नावाखाली किती पैसे घेतले याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली होती. त्या चौकशीमध्ये शहरातील 27 रुग्णांची यादी मनपा आरोग्य विभागास प्राप्त झाली होती….