तंबाखू-सिगारेट घेण्यापूर्वी जाणून घ्या मोदी सरकारचे नवीन नियम..
केंद्र सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांबाबत (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नवीन सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, आता तंबाखूजन्य पदार्थांवर नवीन फोटोसह आणखी कडक इशारा लिहिला जाणार आहे. आता सिगारेटच्या पाकिटांवर मोठ्या अक्षरात ‘तंबाखू सेवन म्हणजेच अकाली मृत्यू’ आणि ‘तंबाखूच्या सेवनाने तरुण वयातच मृत्यू होतो’ असे लिहिणे बंधनकारक…
