दोन लाख रुपये देऊन लग्न केलं; अन् नवरी निघाली दोन लेकरांची आई.
नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नववधू पैसे आणि दागिणे घेऊन पळल्याची घटना उघडकीस आली होती. अशीच घटना बीड जिल्ह्यात समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यामधील तळणेवाडी येथील रहिवासी कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) याने औरंगाबाद मधील एका मुलीचं स्थळ आणलं….
