धक्कादायक! राज्यातील नेते मंडळींनीच थकवले कोटींचे वीज बील; जाणून घ्या कोणी किती थकवले..
वीज बिल थकबाकीदार ‘व्हीआयपी’ ग्राहकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली असून आमदार, खासदार, मंत्री अशा जवळपास ३७२ ग्राहकांकडे सुमारे १ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघड झाली आहे. भारनियमन, विजेच्या दरावरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना विरोधी पक्षाने लक्ष्य केले आहे. तसेच सर्वसामान्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. सामान्य ग्राहकांकडे फक्त शेकडो रुपयांचे विजबिल थकबाकी…