पेट्रोल टाकल्यावर मोटारसायकल पुढे घेण्यावरून वाद, पंपावरच एकमेकांची कॉलर पकडून तुफान राडा..
औरंगाबाद शहरातील सेवन हिल जवळच्या पेट्रोल पंपावर तुफान राडा झाला. पेट्रोल पंपावर काही जण पेट्रोल भरण्यासाठी आले. पेट्रोल पंपावर काही तरुणांनी गाडीत पेट्रोल भरलं. पेट्रोल भरल्यावर गाडी पुढे घेण्या सारख्या शुल्लक कारणावरुन वाद झाला. यानंतर वाद इतका वाढला की आणि दोन गट एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले. पेट्रोल पंपामध्ये झालेल्या या मारामारीच्या घटनेनं एकच गोंधळ उडाला….