पतीला वाचवण्यासाठी तिने घातला बिबट्याच्या जबड्यात हात अन्…!
बिबट्याने जबड्यात नवऱ्याचे डोकं घट्ट पकडलेले असताना सुद्धा तिने हारून न जाता बिबट्याशी झुंज दिली आणि नवऱ्याचे प्राण वाचवल्याची घटना पारनेर तालुक्यातल्या दरोडी चापळदरा इथं घडली असून त्या महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव असून संजना पावडे असं या धाडसी पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक…