पैठण रस्त्यावर ईसारवाडी फाटा येथे टँकर- स्कुल बस- ट्रॅव्हलचा तिहेरी अपघातात 10 जखमी
देवगाव तारोडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील वऱ्हाड लग्नासाठी स्कूल बसने (MH 17 BD 104) बिडकिन येथे जात असताना ईसारवाडी फाट्याजवळ त्यांच्या समोर चालत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या (MH 12 KP 4392 ) टँकरने अचानक उजवीकडे वळण घेतल्यामुळे स्कूल बसच्या चालकाने ब्रेक लावले. स्कूल बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या पर्पल कंपनीच्या ट्रॅव्हल क्रमांक MH…