माता वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू…
श्रीनगर: नववर्षाच्या सुरूवातीलाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा टेकडीवरील माता वैष्णोदेवी मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील गेट क्रमांक तीनजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १२ लोक मरण पावले असून त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी कटरा बेस कॅम्पमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत….
