रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि ५०० रुपये मिळवा..! नितीन गडकरींची घोषणा
रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि ५०० रुपये मिळवा अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. याकरिता लवकरच कायदा आणण्यात येणार आहे असे दिल्लीमधील इंडस्ट्रियल डीकार्बनायझेशन समिट या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी ही घोषणा केली आहे. भारतात अनेक शहरांत नागरिकांना कार पार्किंग विषयीची शिस्त नसल्याचं वेळोवेळी दिसून येते,…
