रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि ५०० रुपये मिळवा..! नितीन गडकरींची घोषणा

रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि ५०० रुपये मिळवा अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. याकरिता लवकरच कायदा आणण्यात येणार आहे असे दिल्लीमधील इंडस्ट्रियल डीकार्बनायझेशन समिट या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी ही घोषणा केली आहे.

भारतात अनेक शहरांत नागरिकांना कार पार्किंग विषयीची शिस्त नसल्याचं वेळोवेळी दिसून येते, त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी कार पार्क करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. म्हणून आता याविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.

पुढे बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, “आम्ही एक कायदा बनवणार आहोत. जो व्यक्ती रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने गाडी उभी करेल त्याला १,००० रुपये दंड आकारण्यात येईल. शिवाय त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपयांचे बक्षीस म्हणून देण्यात येईल.”

नितीन गडकरी म्हणाले की, “माझ्या आचाऱ्याकडे दोन सेकंड हॅन्ड गाड्या आहेत, चार लोकांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. त्या तुलनेत दिल्लीवाले खूप सुखी आहेत. त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी आम्ही रस्ते बनवले आहे.” अनेक लोक आपल्या कारसाठी पार्किंगची व्यवस्था करत नाहीत, त्या ऐवजी कार रस्त्यावर उभी करतात असं नितीन गडकरी म्हणाले.

मुंबई वाहतूक पोलीस अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवणार

मुंबईच्या रस्त्यांवर शिस्त मोडून चालणाऱ्या अवजड वाहनांविरोधात आता कारवाई होणार असून अशा वाहनां विरोधात कारवाई करण्याकरीता मुंबई वाहतूक पोलीस एक विशेष मोहीम राबवणार आहेत. ज्यामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने जड वाहन चालवणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत जास्तीत-जास्त कारवाई केली जाणार आहे.

वाहनचालकाने कोणत्या बाजूने वाहन चालवावे, हे मोटार वाहन नियमामध्ये आधीच नमूद केले आहे. त्यानुसार अवजड वाहन चालकाने आपले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, चालक जड वाहनांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवल्याने वाहतूकीची कोंडी निर्माण होऊन गैरसोय होऊन वेळेचा अपव्यय होत असल्याचे बऱ्याचदा निदर्शनास आले आहे. अशा कृतीमुळे रस्ता अपघातही होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!