मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी दिला चोप; म्हणे लग्नानंतर नवरी पसंत नाही, नवरीविना पाठवली वरात..

औरंगाबाद मध्ये लग्नासाठी आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडाने मानापमानामुळे वाद घातले. याच वादविवादात लग्न लागले. लग्न झाल्यावर नवरोबाने मुलगी पसंत नसल्याची सबब सांगत नवरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडि मंडळींना चांगलाच चोप देऊन त्यांच्या गाड्याच्या काचा फोडून टाकल्या. तशाच फुटलेल्या गाड्या घेऊन नवरीविनाच वराती मुंबईला निघून गेले. त्यानंतर त्या मुलीचे नात्यामधील मुलासोबत रात्री लग्न लावून देण्यात आले. ही घटना औरंगाबाद शहराजवळील गांधेली गावात बुधवारी घडली.

सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील मुलीचा हिचा विवाह मुंबईतील मुलासोबत काल बुधवारी गांधेली येथे आयोजित करण्यात आला होता. मुलीचे मामा आणि बहीण गांधेली येथे राहत असल्यामुळे गांधेली येथेच हा विवाह आयोजित केला होता. लग्नासाठी मुंबईहून ट्रॅव्हल्समध्ये वऱ्हाडी मंडळी आली. लग्न लागण्यापूर्वी वऱ्हाडीतील अनेक जण ‘टुल्ल’ होते. दुपारी 12:30 चे लग्न 3 वाजले तरी लागले नव्हते.

खूप विनवण्या केल्यानंतर लग्न लागले. त्यानंतर वऱ्हाडीं मंडळींनी जेवणावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुलीच्या मेहुण्याने ठरल्यानुसार वर मंडळींना पुरोहिताचे अर्धे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा रागावलेल्या वर नातेवाइकांनी मुलीच्या मेहुण्याबरोबरचे वधू पक्षाकडील दोन महिलांसुद्धा मारहाण करून दोघांची डोकी फोडली.

सदरील घटनेची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे हवालदार दिनकर पांढरे आणि सचिन रत्नपारखे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना वाद मिटल्याचे सांगण्यात आले. मात्र वऱ्हाड मुंबईला निघण्याच्या वेळेस नवरदेवाने आपल्याला मुलगीच पसंत नसून तिला सोबत घेऊन जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडी मंडळीना बेदम मारहाण करून त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या, सीट कव्हरही फाडले. मुंबईच्या वऱ्हाडींना चांगलेच ‘ फटके देऊन’ परत पाठवले. सदरील घटनेची चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रात्री 9:30 वाजता लागला दुसरा विवाह

मुलीचा विवाह झाल्यावर मोडला. त्यामुळे सर्व नातेवाईक चिंतित होते. लग्नाला वेगवेगळ्या ठिकाणांहून बरेच नातेवाईक आले होते. या नातेवाइकांतील वधूच्या आत्याच्या मुलासोबत रात्री 9:30 वाजता दुसरा विवाह लावून दिला गेला. यानंतर वधूच्या नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!