शिक्षण संस्थाचालकांची अशीही ‘शाळा’: औरंगाबादेत सहा अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने ठोठावला प्रत्येकी एक लाखाचा दंड..!
संभाजीनगर (औरंगाबाद) : मान्यता काढून घेतलेली असतांनासुद्धा अनधिकृतपणे शाळा सुरुच ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दणका दिला आहे. अनधिकृतपणे सुरु असलेल्या सहा शाळांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, आता सूचना देऊनही पुढे शाळा सुरु ठेवल्यास दिवसाकाठी प्रत्येकी 10000 रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येणार…
