शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..! पुढील 48 तासांत ‘माॅन्सून’ बंगालच्या उपसागरात…
शेतकऱ्यांकरीता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केरळ आणि अंदमान निकोबारमध्ये दिनांक 26 मे 2022 रोजी माॅन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. पण, येत्या 48 तासांमध्ये माॅन्सून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले ‘असनी’ चक्रीवादळ आता शांत होत असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले असून…
